राज्य कृषी विस्तार सुधार

राज्य कृषी विस्तार सुधार कार्यक्रमांना सहाय्य (आत्मा)

 

राष्ट्रीय धोरणामध्ये कृषी विस्तारामधील क्रांतीकारक बदलाची गरज प्रामुख्याने समोर आली असल्याने या धोरणाचा शिफारशी लक्षात घऊन विस्तार कार्यक्रमांना दिशा देण्याच्या दृष्टिकोणातुन कृषी विस्तारासाठी विस्तृत रूपरेषा विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विस्तार क्षेत्रातील कार्यक्रम पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी या धोरणातील ५ प्रमुख मार्गदर्शक घटक खालील प्रमाणे आहे.

१) सार्वजनीक क्षेत्रातील विस्तार कार्यक्रम पद्धतीमध्ये बदल.

२) सार्वजनीक क्षेत्रातील विस्तार कार्यक्रमांना परिणामकारकरित्या पुरक आमि काही ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी खाजगी प्रोत्साहन देणे.

३) विस्ताराला प्रसार माध्यमे आणि माहीती तंत्रज्ञानाचे सहाय्यं देणे.

४) विस्तार कार्यक्रमामध्ये लिंग समभाव आणने.

५) शेतकय्राचे आणि विस्तार कर्मचाय्रांचे कौशल्य वाढविणे आणि क्षमता वाढविणे.

 

उपरोक्त बाबी लक्षात घेता राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणाकरिता सहाय्य (Extension Reforms-ATMA) योजनेंतर्गत शासन निर्णय दिनांक २५ मार्च २००५ अन्वये राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘आत्मा’ संस्था स्थापन झाल्या असून त्या पंजीकृत करुन घेणे तसेच नियामक मंडळ, आत्मा कार्यकारी मंडळ वगैरे विविध समित्या स्थापन करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावर करण्यात आलि आहे. नियामक मंडळाचे अध्यक्ष जिल्हा अधिकारी हे असुन त्यांचेमार्फत कृषी व संलग्न विभागाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

राज्यातील सर्व जिल्ह्याचे यथार्थदर्शी संशोधन विस्तार आराखडे तयार झाले असून आराखड्यानुसार जिल्ह्यातील कृषी व संलग्न विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शैक्षणीक सहल, शेतकरी समूह, सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमांना लाभ देणे, उत्कृष्ट संघटीत गटांना बक्षिसे व प्रोत्साहन देणे, शेतकरी बक्षिसे, कृषी माहीती प्रसारणासाठी पुस्तके, लिफलेट, भित्तीपत्रके छपाई करणे व जाहीराती देणे, कृषी प्रदर्शने आयोजित करणे, शेतकय्रापर्यंत विविध माध्यमातून माहीती तंत्रज्ञान प्रसारित करणे, शेतकरी-शास्त्रज्ञ यांची एकचित सांगळ घालण्यासाठी कार्यशाळा घेणे, क्षत्रीय दीवस व विकास गोष्टी आयोजित करणे इ. विविध उपक्रम राबवून तसेच शेतकय्रांना अध्यावत माहीती देऊन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत कम्युनिटी रेडीओ स्टेशन स्थापन करून संबंधित क्षेत्रातील शेती व शेती पुरक अडचणी सोडविण्याकरिता आवश्यक तांत्रीक मार्गदर्शन करणे, किसान क्रेडिट कार्ड, बाजार समिती, स्थापनकरून शेतमाल दर निशचित करणे, कृषी विभागाच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत शेतकय्रांची गरज लक्षात घेता, कृषी आधारित कार्यक्रम दुरदर्शनच्या २ उपकेंद्र व ११ आकाशवाणी केंद्रामार्फत घेण्यात येतात. सदर कार्यक्रम तयार करण्याकरिता जिल्हा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीमार्फत जिल्ह्यातील प्रमुख पिकाचा कार्यक्रम तयार करण्यात येतो. कृषी खात्यामार्फत सुद्धा शेतकय्रांना सुधारित तंत्रज्ञान अवगत करण्यात येत आहे. या बाबत कृषी विभागाची वेबसाईट तयार करण्यात आलेली असून ती इंटरनेटवर जोडण्यात आलेली आहे.