शेती

 

कोरडवाहू शेती, अन्नधान्याची तूट, शेतीची उत्पादकता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी, तेलबियांच्या उत्पादनाची पिछेहाट, उसाच्या उत्पादनात देशातील आघाडी, दुधाच्या उत्पादनातील लक्षणीय वाढ असे राज्याच्या शेतीचे आजचे संमिश्र चित्र आहे. लागवडीखालील निव्वळ क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र्राचा भारतात दुसरा क्रमांक होता. दुबार पिके घेण्याबाबतीत राज्याचा भारतात १८ वा क्रमांक होता. लागवडीखालील क्षेत्र व एकुण उत्पादन यांचे प्रमाण महाराष्ट्र्रात व्यस्त आहे. ऊस वगळता सर्व शेतकी उत्पादनाची हेक्टरी उत्पादकता महाराष्ट्र्रात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. येथील शेती मुख्यत: मोसमी पावसावर अवलंबून आहे.

पाऊसमान व पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे. एकुण लागवडीच्या क्षेत्रापैकी फक्त १५ टक्के क्षेत्र ओलिताखाली (एकुण भारतातील अशा क्षेत्राची सरासरी ४० टक्के, पंजाब ९४ टक्के, हरियाणा ७५ टक्के, तामिळनाडू ४८ टक्के), खतांच्या हेक्टरी कमी वापर (महाराष्ट्र्र दर हेक्टरी ६६ किलो खते, पंजाब १७६ किलो, तामिळनाडू १३७ किलो) अशा कारणांमुळे शेतीची वाढ असमाधानकारक राहिली. १९६० ते २००० या काळात उत्पादकतेत फारसा फरक पडला नाही ही त्यातही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही; एकुण गरजेच्या ८० टक्के उत्पादन महाराष्ट्र्रात होते. देशातील एकुण अन्नधान्य उत्पादनात महाराष्ट्र्राचा वाटा सतत घटत आहे.

शेतीचे भौगोलिक क्षेत्र :

तापी, वैनगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांच्या खोर्‍यांचा प्रदेश हा शेतीचा मुख्य विभाग आहे. सातपुडयाच्या रांगा व पश्चिम घाटाचे क्षेत्र एकुण शेतीच्या सुमारे १८ टक्के आहे व तेथील शेतीवर डोंगराळ भागांमुळे मर्यादा पडल्या आहेत.

ज्वारी, तांदूळ, गहू, बाजरी, मका, बार्ली, नाचणी ही तृणधान्ये; डाळी, तूर ही कडधान्ये; ऊस, कापूस, मिरची, तंबाखू ही नगदी पिके; भुईमूग, तीळ, जवस, मोहरी, करडी, एरंडी ही गळिताची पिके महाराष्ट्र्रात प्रामुख्याने होतात. राज्यात ज्वारी, बाजरी, भात, कापूस, भुईमूग ही खरीप तर गहू, हरबरा, ज्वारी ही रब्बी पिके आहेत.

शेती विकास :

शेतीच्या विकासाचे दोन प्रकार मानण्यात येतात. संस्थात्मक सुधारणा. हा पहिला प्रकार. प्रत्यक्ष जमीन कसणारा शेतकरी, जमीन मालक व शासन यांच्यात सुसंवाद असणे, मालकांकडून जमीन कसणार्‍या कुळाची शेतकर्‍यांची पिळवणूक होऊ न देणे, विकासाचे सर्व कार्यक्रम तळाच्या शेतकर्‍यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे, हे बदल यात अभिप्रेत असतात. जमीनधारणा विषयक कायदे अंमलात आणून हे बदल केले जातात.

जमिनदारी, महालवारी, रयतवारी अशा तीन कुळ वहिवाटीच्या पध्दती ब्रिटिशांच्या काळापासून प्रचलित होत्या. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने रयतवारी पध्दत होती. ही पध्दत कागदोपत्री इतर पध्दतीपेक्षा चांगली वाटली तरी प्रत्यक्षात शेतीच्या कसणुकीच्या पध्दतीत काही त्रुटी शिल्लक राहिल्या होत्याच. जमिनीची लहान तुकडयात वाटणी, जबर खंड, वहिवाटांची हक्काची अनिश्चितता, जमिनीची अत्यल्प सुधारणा, शेतीची कुंठितावस्था हे दोष शेतीत शिल्लक राहिले. मुंबई राज्यात १९३९ मध्ये शेती सुधारणेचे पहिले कायदे समंत केले गेले. स्वातंत्र्यानंतर १९४८, १९५७, १९६२, १९६५, १९७५ या वर्षी आणखी कायदे संमत केले गेले.

१९५० सालापासून महाराष्ट्र्रात पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम, केंद्राप्रमाणेच राबविला गेला आहे. पहिल्या दोन योजना काळात महाराष्ट्र्र संयुक्त मुंबई प्रांतात समाविष्ट होता. त्यामुळे खर्‍या अर्थाने महाराष्ट्र्राची पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे देशाची तिसरी योजना होय.

महाराष्ट्र्रात १९६६ ते १९६९ या काळात ३ वार्षिक योजना १९७९ ते १९८० या काळात १ वार्षिक योजना १९९०-९२ या काळात दोन वार्षिक योजना, १ एप्रिल २००७ पासून महाराष्ट्र्राची नवीन पंचवार्षिक योजना सुरु झाली.

महाराष्ट्र्रातील नियोजन यंत्रणा

महाराष्ट्र्रात राज्य स्तरावर नियोजन उपसमिती व राज्य नियोजन मंडळ या दोन उच्चस्तरीय संस्था आहेत. त्यांची कार्य साधारणत: योजना आयोग किंवा राष्ट्रीय विकास परिषद यांच्या कार्यासारखीच आहेत. मुख्यमंत्री हे या दोन्ही संस्थाचे अध्यक्ष असतात. नियोजन उपसमितीचे कार्य नियोजनाबाबतच्या सर्व बाबींबाबत अंतिम निर्णय घेण्याचे असून राज्य नियोजनात मंडळ ही सल्ला देणारी संस्था आहे.

महाराष्ट्र्र राज्याच्या पंचवार्षिक योजना ( रु. कोटी)

योजनेचा कालावधी नियत खर्च प्रत्यक्ष खर्च
१९५१-५६ १४६.३१ १५४.७१
१९५६-६१ २६६.२५ २६६.३०
१९६१-६६ ३९०.२० ४३४.७३
१९६६-६९ ३८९.४३ ३८५.६०
(तीन वार्षिक योजना)    
१९६९-७४ १०००.२२ १००४.५१
१९७४-७९ २३४७.६१ २६६०.१३
१९७९-८० ७६२.५० ३८५.६०
( एक वार्षिक योजना)    
१९८०-८५ ६१७५.०० ६५३८.२४
१९८५-९० १०५००.०० १५२००.००
(दोन वार्षिक योजना    
१९९२-९७ १८५२०.०० २५७५१.००
१९९७-२००२ ४५१२५.०० ४६१३९.९०
२००२-२००७ ५५८८६.४० ……

 

महाराष्ट्र्राची दहावी पंचवार्षिक योजना २००२ -०३

(नित्यव्यय व एकूण तरतुदींशी टक्केवारी कोटीमध्ये)

क्र. विकास क्षेत्र एकूण खर्च टक्केवारी
१) अर्थसंकल्पबाह्य १८,९०७.६८ २८.३८
२) सामूहिक सेवा १५,०२३.४५ २२.५५
३) विद्युत विकास ७३२९.४१ ११.००
४) पाटबंधारे पूरनियंत्रण ६९९१.९१ १०.४९
५) ग्रामीण विकास ६९१९.७२ १०.३८
६) वाहतूक, दळणवळण ३४१७.२१ ५.१३
७) कृषी व संलग्न सेवा २६९८.६२ ४.०५
८) सामान्य आर्थिक सेवा २५९९.५१ ३.९०
९) इतर उपक्रम ११५९.६० १.७४
१०) उद्योग व खाणकाम ७१६.५६ १.०८
११) सामान्य सेवा ४४०.५८ ०.६६
१२) विशेष घटक कार्यक्रम ३७३.२२ ०.५६
१३) विज्ञान तंत्रज्ञान ५५.२५ ०.०८
  एकूण ६६,६३२ १००

 

कापड उद्योगधंदा

कापडाच्या उत्पादनात इ.स. १५०० पर्यंत जवळजवळ ३० शतके भारताचे जगात अग्रगण्य स्थान होते. भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये ऋग्वेदात कापसाचा संदर्भ आढळतो. हेरीडोटसनी शतकात भारताच्या कापसाची स्तुती केली आहे की भारतामध्ये अशा प्रकारचे एक झाड आहे की, मेंढयापासून तयार होणार्‍या लोकरीपेक्षाही अतिशय मऊ आणि चांगल्या प्रतीचे सूत तयार होते आणि त्यापासून भारतीय लोक कापड बनवितात. डाक्क्याची अतिशय तलम मलमल तर जगप्रसिध्दच होती. हवा, शबनम इत्यादी अनेक नावांनी ही मलमल परदेशीयांना परिचित होती. उत्कृष्ट दर्जाची कापडनिर्मिती करणारी आणखीही काही ठिकाणे होती. कालिकतचे तलम पांढरे ‘कॅलिको’ कापड, मच्छलीपठ्ठणचे चितान’ आणि बर्‍हाणपूरची भरजरी वस्त्रे’ प्रसिध्द होती.

कापड उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण

कापड गिरण्याचे स्थान, कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठा :

कापड उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण पूर्णपणे कच्चामाल पुरवठीय आहे. कापड गिरण्यात एक टन वेचलेल्या कापसापासून जवळ जवळ एक टन सूत आणि एक टन सुतापासून एक टन कापड विणले जाते. कापड गिरण्यात शक्ितसाधनांची आवश्यकता असली तरी कच्चा माल गाठीनी दूर अंतरावर पाठविता येतो. कापूस आणि तयार कापड पाठविण्यास येणारा वाहतुकीचा खर्च साधारण सारखाच असतो. कापसाच्या गाठी आणि त्याचप्रमाणे कापड सहजरीत्या उत्पादनखर्चात फारशी वाढ न होता कित्येक कि. मी. लांब पाठविता येते म्हणून वाहतुकीचा कमीत कमी खर्च येण्यासाठी कापड गिरण्यांचे स्थान कापसाचे उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ या असू शकतात.

कापड उद्योगधंद्याची उभारणी :-

भारतीय कापड गिरण्यात आज मंुबईला महत्वाचे स्थान असले तरी भारतात पहिली कापड गिरणी उभारण्याचा मान बंगालला मिळाला आणि तिची मालकी ब्रिटिशांची होती. इ.स. १८१८ मध्ये हावडा जिल्हयात हुगळी नदीवर कोलकत्याजवळ चूरसी येथे फ़ोर्ट ग्लॉस्टर मिलची स्थापना केली. मुंबई येथे १८५१ मध्ये श्री. कावसजी नानाभाई दावर यांनी बॉम्बे स्पिनिंग आणि विवहिंग कंपनी लि. नावाची पहिली कापड गिरणी उभारली. कापड गिरण्यांची १८६५ ते ७१ दरम्यान फारच कमी प्रगती झाली. मॅंचेस्टरने भारताचा कापड उद्योगधंदा वाढण्यास कोणताही पुढाकार घेतला नाही. १८७८ मध्ये इंग्लंडमध्ये भारतीय कापडावरील आयात कर बर्‍याच प्रयत्नांवर उठविण्यात आला.

१८७१-९२ दरम्यान कापड गिरण्या वाढल्या, याचे प्रमुख कारण १८६९ मध्ये सुएझ कालव्याचे उद्घाटन होय. यामुळे मुंबई आणि लंडनचे अंतर ६४०० कि. मी. नी कमी झाले. त्याचप्रमाणे आपल्या देशामधील रेल्वेचे जाळे १८,२०० कि. मी. पर्यंत वाढले. १८६९ मध्ये १६ गिरण्या होत्या, त्यापैकी मंुबईला ९ आणि कोलकत्याला २ कापडगिरण्या होत्या. उद्योगधंद्याच्या वाढीबरोबर त्यांची क्षमता वाढत होती.

सारख उद्योगधंदा :-

आपल्या भारतालाच नव्हे तर महाराष्ट्र्रातील फार प्राचीन काळापासून साखरेचा उपयोग माहीत आहे. ऋग्वेदामध्ये पूजाविधी करताना नैवेद्यासाठी साखरेचा उपयोग केला जात असल्याचा उल्लेख आढळते. मनू आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही साखरेसंबंधी पुरावे आहेत. अलेक्झांडर चिनी राजा ताउत्सुंग यांनी भारतीय साखरेचा उल्लेख केलेला आहे.

महाराष्ट्र्राच्या कृषी औद्योगिक क्षेत्रात साखर उद्योग हा एक महत्वाचा व मोठा घटक आहे. महाराष्ट्र्राच्या ग्रामीण भागाचे आर्थिक शैक्षणिक व सामाजिक स्थित्यंतर करणारा हा उद्योग नवसमान निर्मितीचे नवे दालन उघडीत आहे. अशा प्रकारे साखर कारखाना हा ग्रामीण भागातील कृषी औद्योगिक समाजरचनेच्या पुनर्बांधणीत सर्वांगीण प्रगतीचे केंद्र माणून ग्रामीण भागाचे नंदनवन करणारा’ हा व्यवसाय महाराष्ट्र्रात निश्चितच भूषणास्पद ठरला आहे.

साखर उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण व कारणे

आधुनिक काळात भारतामध्ये बंगाल आणि बिहारमध्ये काही इंग्रजांनी साखर कारखाने उभारण्याचे प्रयत्न सुरु केले. महाराष्ट्र्रात पहिला साखर कारखाना १९२० ला अहमदनगर जिल्हयात बेलापूर येथे उभारण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र्रात साखर कारखान्यांची वाढ होत गेली. महाराष्ट्र्राच्या शेतीव्यवसायात कृषीव्यवसायावर आधारित साखर उद्योगधंदा सर्वात प्रगत व्यवसाय मानला जातो. शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगांची जोड शेतीला दिली तर शेतकर्‍यास व्यवसाय परवडतो हे महाराष्ट्र्रातल्या साखर उद्योगाने सिध्द केलेले आहे.

रसायन उद्योगधंदे

उद्योगधंद्याचा विकास होण्यासाठी लोहपोलादसारख्या मूलभूत उद्योगाप्रमाणेच रासायनिक उद्योगधंद्याचा विकास होणेही अत्यंत आवश्यक असते. रासायनिक उद्योगधंद्यामध्ये विविध प्रकारच्या रसायनांची निर्मिती करावी लागते. या दृष्टीने सल्फ्युरिक अ‍ॅसिड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, नायर्टिक अ‍ॅसिड, सोडा, अ‍ॅश, पेट्रोकेमिकल्स इत्यादींची अत्यंत गरज असते. प्रामुख्याने गंधक आणि गंधकाची संयुगे व त्यांची अ‍ॅसिडस यांना मोठया प्रमाणात मागणी असते. महाराष्ट्र्रात अशा रासायनिक उद्योगधुद्यांचे केंद्रीकरण प्रामुख्याने पुढील प्रदेशात झालेले आहेत.

(१) मुंबई शहर व मुंबई उपनगर (२) ठाणे व त्याचा परिसर (३) रायगड जिल्हा (४) पुणे व त्याचा परिसर (५) अन्य क्षेत्रे.

(१) मुंबई शहर व मुंबई उपनगर :-

मंुबईला अभियांत्रिकी उद्योगांचे जाळे पसरलेले आहे. विविध प्रकारच्या उद्योगांना आवश्यक असणारी रसायने पुरविण्यासाठी मंुबईला रासायनिक निर्मितीसाठी अनेक केंद्र आहेत. हे महानगर म्हणजे अत्यंत आधुनिक उद्योगधंद्यांना मूलभूत सोयी पुरविणारे महत्वाचे केंद्र आहे.

पेट्रोकेमिकल्स निर्मितीचे केंद्रे तुर्भेला आहेत. तेथे असणार्‍या तेलशुध्दीकरण कारखान्यामध्ये देशातील ५०% पेक्षा जास्त पेट्रोलियम पदार्थाच्या उत्पादनासाठी कच्चा माल पुरविला जातो. तुर्भे परिसरात असलेल्या या केंद्रामधून इथिलीन, प्रॉपिलिन, बेन्झीन, फिनॉल, अ‍ॅसिटोन, पी. व्ही. सी. उत्पादने पुरविली जातात.

(२) ठाणे व त्याचा परिसर :-

मंुबईच्या खालोखाल मुंबईचाच एक अविभाज्य भाग असलेल्या या पट्टयात अभियांत्रिकी उद्योगाबरोबर रासायनिक उद्योगांचा मोठया प्रमाणात विकास झालेला आहे. अंबरनाथ, ठाणे, बेलापूर, हा भाग रासायनिक विभाग म्हणूनच ओळखला जातो. या ठिकाणी प्रामुख्याने नॅप्था, इथिलीन व क्लोरीनचे उत्पादन घेतले जाते. हेवी केमिकल्सची उत्पादने मुंबईबरोबरच ठाण्याला उत्पादित केली जातात.

मुंबई आणि ठाणे परिसरात रासायनिक उद्योगधंद्याबरोबरच त्या अनुषंगाने औषधे, कीटकनाशके औषधे, कॉस्टिक सोडा, रंग, फौंड्री केमिकल्स, इलेक्ट्रो केमिकल्स सोडा, थर्मोकॉल इत्यादी विविध प्रकारचे उत्पादन मुंबई-ठाणे परिसरात केले जाते. तारापूर, पाताळगंगा, डोंबिवली, ठाण्याच्या खाडीचा परिसर व अंबरनाथ येथे केमिकल कॉम्प्लेक्स उभारलेले आहेत.

खत कारखाने

रासायनिक खत कारखान्याच्या निर्मितीसाठी जिप्सम, कोळसा व पाणीपुरवठा इत्यादींची गरज असते. रासायनिक खतामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे प्रमुख घटक आहेत. अमोनियाचा जमिनित प्रत्यक्ष वापर करता येत नाही. त्यामुळे अमोनिअम सल्फेट, अमोनिअम फॉस्फेट, युरिया, अमोनिअम नायट्रेटमध्ये रुपांतर करावे लागते.

भारतात या उद्योगामधून पेट्रोलिअम नॅफ्था आणि कोकपासून हायड्रोजन मिळवितात. यामुळे आपल्या देशातील खत कारखाने खनिज तेल शुध्दीकरण कारखान्याजवळ उभारलेले आहेत. फॉस्फरस खतासाठी रॉक फॉस्फेटची गरज असते. मुंबईजवळ समुद्रात “बॉम्बे हाय” येथे खनिज तेल सापडते व त्याचे शुध्दीकरण करुन पेट्रोलिअम व इतर उत्पादने काढली जातात. महाराष्ट्र्रात खत निर्मितीचे सहा कारखाने आहेत. खत कारखाने थळ -वायशेत, तुर्भे येथे आहेत.

खतांचे मोठे प्रकल्प

महाराष्ट्र्रात (१) मिश्र खत, (२) सूक्ष्म द्रव्य खत (३) सेंदि्रय खतांचे छोटे प्रकल्प बर्‍याच ठिकाणी आहेत.

(१) मिश्र खत :-

महाराष्ट्र्रात मिश्र खतांचे छोटे प्रकल्प २८ आहेत यांपैकी सर्वा जास्त छोटे प्रकल्प मुंबईला (७) आहेत या खालोखाल मिश्र खतांचे छोटे प्रकल्प पुण्याला ४ आहेत तर जळगाव व नांदेडला प्रत्येकी ६ प्रकल्प आहेत. याशिवाय औरंगाबाद, जालना, व नागपूरला प्रत्येकी २ प्रकल्प आहेत. सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, व यवतमाळ येथे प्रत्येकी १ प्रकल्प मिश्र खतांचा आहे.

(२) सूक्ष्म द्रव्य खत :-

महाराष्ट्र्रात सूक्ष्म द्रव्य खतांचे छोटे प्रकल्प २२ आहेत. यांपैकी सर्वात जास्त प्रकल्प पुण्याला ९ आहेत. या खालोखल नाशिकाला सूक्ष्म द्रव्य खतांचे ४ प्रकल्प आहेत. सुक्ष्म द्रव्य खतांच्या प्रकल्पाची जळगावला संख्या ३ आहे. मुंबईला सूक्ष्म द्रव्य खताचे २ छोटे प्रकल्प आहेत. याशिवाय सांगली कोल्हापूर, औरंगाबाद व अमरावती प्रत्येकी एक छोटा प्रकल्प सूक्ष्म द्रव्य खतांचा आहे.

(३) सेंदि्रय खत :-

महाराष्ट्र्रात सेंदि्रय खताचे छोटे प्रकल्प ६ आहेत. यांपैकी मुंबईला ३ प्रकल्प आहेत तर पुणे, कोल्हापूर व नाशिकला प्रत्येकी छोटा प्रकल्प सेंदि्रय खताचा आहे.

मोटर वाहन निर्मिती उद्योग

मोटर वाहन उद्योगाचा विकास विसाव्या शतकामधील आहे. अल्पावधीत मोटर उद्योग भरभराटीस आला. मोठया प्रमाणात उत्पादन करून यशस्वी उद्योगाचे हे एक विरळ उदाहरण आहे. समाजाच्या अर्थकारणात मोठया प्रमाणात परिणाम करणारा मोटार उद्योग आहे.

मोटर वाहन निर्मितीसाठी अनेक वस्तंूची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पोलाद, लोखंड, रबर, शिसे, फायबर, ग्लास, वगैरे मोअर उद्योगास अनेक वसतूचा सातत्याने पुरवठा होणे आवश्यक असते व या सर्व वस्तू कमी किंमतीमध्ये मिळणे महत्वाचे असते. याचे प्रमुख कारण कच्च्या मालाचा सतत पुरवठा आणि त्याची किंमत यावरुन त्याचे मोठया प्रमाणावरील उत्पादन अवलंबून असते. साहजिकच मोटर उद्योगाचे स्थानिककीकरण मुंबईसारख्या औद्योगिक क्षेत्रात किंवा त्याच्या जवळपासच्या क्षेत्रात झाले तर या दोन्ही गोष्टी साध्य होतात. कच्च्या मालासाठी कमी वाहतूक खर्च हे देखील आवश्यक असते.

मोटर उद्योगावर बाजारपेठेचा प्रभाव प्रामुख्याने होतो. साहजिकच अशा उद्योगधंद्यांचे स्थानिकिकरण महानगराच्या परिसरात होते. कारण तेथील लोकांची क्रयशक्ती जास्त असते. या सर्व कारणांसाठी मुंबई-पुणेसारख्या प्रभावी बाजारपेठेत मोटर उद्योग स्थापित होतात.

मोटर उद्योग हा दोन भिन्न विभागांचे एकत्रीकरण होय (१) मोटारीने वेगवेगळया भागांचे उत्पादन करणारा विभाग की ज्यात मोटारीचे इंजिन, सांगाडे, चाके इत्यादीचे उत्पादन (२) मोटारीचे लहान लहान सुटया भागांचे उत्पादन.

महाराष्ट्र्रात मोटर उद्योगाचे स्वरुप:-

महाराष्ट्र्रात मोटर उद्योगात मुंबईशहर महत्वाची कामगिरी करीत आहे. टेल्को हे बस व ट्रक निर्मिती येथे करतात याचप्रमाणे जाीपची निर्मिती महिंद्रा कंपनी करते. पूणे चिंचवड परिसरही मोटर उद्योगात आघाडीवर आहे. चिंचवडला बजाज ऑटोचा दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहन निर्मितीचा कारखाना आहे.

स्कूटर्स व मोपेडची निर्मिती औरंगाबाद (वाळूज) सातारा व अहमदनगर येथे होतो. बारामतीला रिक्षाची निर्मिती करतात, जळगाव व नागपूर येथेही मोटारीचे सुटे भाग याची निर्मिती करतात. महाराष्ट्र्रात नावाजलेल्या ट्रक्स कंपनीचे ट्रक्स टेम्पो, रिक्षा, स्कूटर्स, मोटर यांची निर्मिती करतात.

महाराष्ट्र्रातील अन्य उद्योगंधंदे

अभियांत्रिकी उद्योगधंदे :-

महाराष्ट्र्रात अभियांत्रिकी उद्योगधंदा बराच विकसित झालेला आहे. यामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर आघाडीवर आहे. या खालोखाल ठाणे, पूणे, पिंपरी, चिंचवड आघाडीवर आहेत. या उद्योगांना कच्च्या मालाची आवश्यकता असते याची उपलब्धता जमशेदपूर, भिलाईसारख्या कारखान्यांमधून होते. वरील उद्योगधंद्याच्या परिसरातील कारखानदार, तंज्ञात्र व कामगार त्यांच्या यशासाठी यांना श्रेय द्यावयास पाहिजे. मुंबई, पुणे, या प्रमुख अभियांत्रिकी औद्योगिक शहराव्यतिरिक्त कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा व नाशिक येथेही अभियांत्रिक उद्योगाची वाढ झालेली आहे.

मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड व पूणे परिसरात ट्रक व मोटर स्कूटर मोटर सासकल्स, दुग्धोत्पादन व्यवसायाची उपकरणे साखर कारखान्यास आवश्यक यंत्रसामग्री इंजिने पंप इ. निर्मिती करतात कोल्हापूर व अहमदनगर ही शहरे धातूकाम व फॅब्रिकेशसाठी प्रसिध्द आहे. याचप्रमाणे वालचंदनगर, सातारा व किर्लोस्करवाडी येथेही अभियांत्रिकी उद्योग चालतात.

बेलापूर, कल्याण, सातपूर व अंबड, वाळुंज व चिखलठाणा (औरंगाबाद) येथे अभियांत्रिकी उद्योगधंदे आहेत.

खनिजावर आधारित उद्योगधंदे :-

महाराष्ट्र्रात लोह खनिज, दगडी कोळसा, मॅग्नीज इत्यादी खनिजे सापडतात. मॅगेनीज शुध्द करण्याचा कारखाना भंडारा जिल्हयात तुमसर येथे आहेत.

काच सामानाचे कारखाने :

मुंबई येथे मोठया प्रमाणात काच सामानाचे कारखाने आहेत. याशिवाय नागपूर तळेगाव दाभाडे चंद्रपूर, गोदिंया, येथेही काच सामानाची निर्मिती केली जाते.

संरक्षण साहित्य :-

महाराष्ट्र्राचा संरक्षण साहित्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. पुण्याजवळा खडकीचा दारुगोळा कारखान ब्रिटिश काळापासून कार्यन्वित आहे. याचप्रमाणे देहूरोडलाही याची निर्मिती करतात. (जि. चंद्रपूर), भुसावळ जवळ वरणगाव (जि.जळगाव), ओझर (जि. नाशिक), जवाहरनगर (जि. भंडारा), वाडी (जि. नागपुर) येथे संरक्षण साहित्याची निर्मिती करतात.

औषध निर्मितीचे कारखाने :-

महाराष्ट्र्रात औषधनिर्मितीची कारखाने मुंबईला आहेत. परदेशी औषध कंपन्यांच्या सहकार्याने भारतीय कंपन्या अनेक औषधांची निर्मिती मुंबईला करतात. येथे अनेक वैद्यकीय संस्था व संशोधन शाळा आहेत. याचा फायदा औषध निर्मितीस होत आहे. पुणे-पिंपरी येथे हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्सचा कारखाना आहे. आयुर्वेदिक औषधाची निर्मिती पूणे, सातारा, औरंगाबाद, पनवेल, नागपूर, अहमदनगर, येथे केली जाते. याचप्रमाणे अमरावती, जळगाव, रत्नागिरी, जिल्हयात औषधांची निर्मिती केंद्र आहेत. रसायनी पनवेल (रायगड) येथे औषध निर्मिती होते.

विद्युतसामग्री व उपकरणे :

अभियांत्रिकीचा जोड उद्योगंधंदा म्हणजे विद्युतसामग्री होय टयूबस् , बल्ब, स्विचेस, लाऊडस्पीकर, ट्रान्सफॉर्मर्स, केबल्स, इत्यादीची निर्मिती करणारे महाराष्ट्र्रात अनेक कारखाने आहेत. मुंबई पूणे परिसरात याचे केंद्रीकरण झालेले आहे.

अन्य कारखाने :-

मुंबईला माझगाव जहाज बांधणी केली जाते, दुरदर्शन संचाची निर्मिती मुंबई, अहमदनगर औरंगाबाद येथे केली जाते. रेडिओ, वाशिंग मशीन यांची निर्मिती मुंबई- पूणे परिसरात करतात.

उद्योग शहरे कापड गिरण्या मुंढवा (पुणे), बल्लापूर (चंद्रपूर), खोपोली (रायगड) साखर कारखाने शाहूनगर, श्रीरामपूर, कोपरगांव, राहूरी, कागल, बारामती, अकलूज, माळीनगर, सोमेश्वरनगर, हुवरी, प्रवरानगर, संगमनेर, सांगली, कोल्हापूर, श्रीगोंदा. लाकूड कारखाने बल्लारपूर (चंद्रपूर) व चंद्रपूर, अमरावती कापड गिरण्या मुंबई, नागपूर तेलशुध्दीकरण केंद्रे तुर्भे (मुंबई) शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स किर्लोस्करवाडी, सातारा, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी काचेच्या वस्तू तळेगावं, ओगलेवाडी, चंद्रपूर हातमाग इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव, भिवंडी चलनी नोटा, पोस्ट कराड, पाकिटे व तिकिटे नाशिक संरक्षण साहित्य खडकी व देहूरोड (पुणे,) भद्रावती (चंद्रपूर), ओझर (नाशिक), जवाहरनगर (भंडारा), वाडी (नागपूर), वरणगांव भुसावळ (जळगाव) औषधे: रसायनी पनवेल (रायगड), पिंपरी (पुणे), मुंबई, सातारा, नाशिक इंजिनियरिंग मुंबई, ठाणे, बेलापूर, अंबरनाथ, कल्याण, पिंपरी चिंचवड व भोसरी (पुणे), सातपुर व अंबड (नाशिक), वाळुंज व चिखलठाणा (औरंगाबाद) खत तुर्भे, थळ वायशेत (ठाणे).

 

महाराष्ट्र्राच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते. त्याचप्रमाणे हवामानातील विविध आविष्कारातही विभिन्नता आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र्रात एकाच प्रकारची शेती करणे शक्य असत नाही. मशागत करण्याच्या पध्दतीमध्ये प्रादेशिक घटकांच्या मुख्यत्वेकरुन प्रभाव पडतो. महाराष्ट्र्रात शेतीचे पुढील प्रकार आहेत.

(१) ओलीत शेती (२) आर्द्र शेती (३) बागायत शेती (४) कोरडवाहू किंवा जिराईत शेती (५) पायर्‍या पायर्‍यांची शेती (६) स्थलांतरित शेती

ओलीत शेती

ज्या भागात पावसाचे वार्षिक प्रमाण २०० ते ४०० सेंमी पेक्षा जास्त आहे तेथे ओलीत शेती चालते. महाराष्ट्र्रात कोकण किनारपट्टीचा सहयाद्री पर्वतालगतचा, उत्तर दक्षिणेचा चिंचोळा भाग, काही प्रमाणात घाटमाथ्यावरचा भाग जास्त पावसाचा आहे. पिकांच्या दृष्टीने पाऊसच खूप असल्याने प्रमुख अन्नधान्य म्हणून तांदळाची सर्वत्र लागवड करतात. खरीप हंगामात तांदळाची लागवड केली जाते. रब्बी हंगामात कडधान्यांची लागवड बर्‍याच भागात करतात. बागा हे कोकणच्या शेतीचे वैशिष्टये आहे. आंबा, फणस, काजू यांच्या बागा आहेत.

आर्द्र शेती

वार्षिक पर्जन्य १०० ते २०० सें. मी. असणार्‍या प्रदेशात आर्द्र शेती केली जाते. निश्चितपणे पर्जन्य असणार्‍या प्रदेशात आर्द्र शेती करतात. पावसाच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड केली जाते. कोकण किनारपट्टी, सहयाद्रीच्या पूर्वेकडचा मावळ प्रांत, पूर्व विदर्भात या भागात १०० ते २०० सें. मी. पाऊस पडतो. कोकणात तांदूळ हे प्रमुख पीक आहे. याचप्रमाणे विविध प्रकारची फळफळावळ, नारळ पोफळीच्या भागा आढळतात. पूर्व विदर्भात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोर्‍याच्या प्रदेशात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तांदूळ हे महत्वाचे पीक आहे. तलाव व जलसिंचनाच्या सोयी आहेत यामुळे वर्षातून दोनदा तांदळाचे पीक घेतले जाते. खरीप पिकाचे हेक्टरी उत्पादन जास्त आहे. रब्बी हंगामात ज्वारी पिकवितात. जवसाचे पीक घेतले जाते. आंबा व संत्र्याच्या बागाही काही प्रमाणात आहेत. बराचसा भाग अरण्याने व्यापलेला आहे. यामुळे शेती क्षेत्र मर्यादित आहे. परंतु निश्चित स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने पीक बुडण्याची भीती नाही.

बागायत शेती

वार्षिक पर्जन्य ५० ते १०० सें. मी. पडणार्‍या प्रदेशात पाणीपुरवठयाची सोय ज्या भागात होऊ शकते तेथे बागायत शेती केली जाते. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर व अहमदनगर या भागात धरणे बांधलेली आहेत. तेथे बागायत शेती चालते. महाराष्ट्र्रात विहिरी, तलाव, उपसा जलसिंचन, कालव्यामार्फ़त जलसिंचन चालते. याशिवाय अलीकडे ठिबक जलसिंचन व तुषार जलसिंचन यांचाही प्रसार झालेला आहे. या परिसरात वर्षातून एकदा किंवा दोनदा पिके घेतली जातात.

विशेषत: नगदी पिके घेण्याची प्रवृज्ञ्ल्त्;ाी आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र्रात ऊस हे सर्वात महत्वाचे नगदी पीक बागायत शेती म्हणून घेतले जाते. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने साखर कारखाने उभारले गेले व ग्रामीण भागाचे चित्रच बदलून गेले, याचा विकास होऊ लागला. भुईमूग, तंबाखू यासारख्या नगदी पिकांचे क्षेत्र वाढलेले आहे. जलसिंचन क्षेत्रामुळे फळफळावळांचे क्षेत्र वाढलेले आहे. यामध्ये द्राक्षे, डाळिंबे, संत्री, मोसंबी वगैरेचा उल्लेख करता येईल. विदर्भात संत्री हे सर्वात महत्वाचे नगदी फळ आहे. याचप्रमाणे गव्हाचे पीकही काही भागात जलसिंचनावर घेतले जाते. बागायत शेतीचे वैशिष्टये म्हणजे पिकांची खात्री, एकूण उत्पादनात भरघोस वाढ व हेक्टरी उत्पादनात लाक्षणिक वाढ पाहावयास मिळते.

कोरडवाहू किंवा जिराईत शेती

ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण ५० सें. मी. पेक्षा कमी आहे, तसेच कोरडया व निमकोरडया प्रदेशात कोरडवाहू शेती चालते. महाराष्ट्र्रात कमी पावसाचा प्रदेश हा अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने सोलापूर व अहमदनगर संपूर्ण जिल्हे सांगली, सातारा, पुणे, नाशिक व धुळे जिल्हयांचा पूर्व भाग तसेच मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्हयाच्या पश्चिम भागांचा समावेश होतो. महाराष्ट्र्रातील सुमारे २० % लोकसंख्या या अवर्षणग्रस्त क्षेत्रात राहते.

मान्सूनमध्ये पडणारा पाऊस अपुरा, बदलता व अनियमित असल्याने शेतकर्‍यांना अवर्षणास सतत तोंड द्यावे लागते. या प्रदेशातील शेतीची मशागत पध्दत विशेष प्रकारची असते. मान्सूनचा पहिला पाऊस पडण्यापूर्वी शेतीची खोलगट नांगरट केली जाते. पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी शेतजमिनीत मुरते. त्यानंतर जमीन सपाट केल्याने जमिनीत पाण्याचा ओलावा निघून जात नाही. उपलब्ध ओलाव्यावर वर्षातून एकच पीक घेता येते. ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता कमी असते व ज्यांची मूळे फार खोलवर जाणार नाहीत अशी पिके घेतली जातात. यामध्ये ज्वारी, बाजरी, मका यासारखी भरडधान्ये पिकविली जातात. अनिश्चित पावसामुळे पिकांचे उत्पादन फारसे चांगले येत नाही. परंतु पाऊस नियमित पडला व पिकांना पाणी मिळाले तर भरघोस पिके येतात.

पायर्‍या पायर्‍यांची शेती

डोंगराळ भागात सपाट प्रदेशाप्रमाणे शेतजमीन उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी डोंगराच्या उतरावर पायर्‍या पायर्‍यांचा उतार केला जातो. या उतारावर लहान लहान बांध टाकलेले असतात. यामुळे डोंगराळ भागात माती अडविली जाते व ती पुन्हा वरच्या भागात पसरविता येते. अशा प्रकारची शेती सहयाद्रीच्या पर्वतमय प्रदेश व डोंगरांगा, पूर्व विदर्भाच्या डोंगररांगा, खानदेश व अमरावतीच्या डोंगराळ भाग व मावळ प्रांतात पायर्‍या-पायर्‍यांची शेती केली जाते. अशा भागात तांदळाची लागवड प्रामुख्याने करतात. काही विशेष जातीच्या तांदळाची लागवड करतात. याचप्रामणे डोंगराळ भागात वरी, नाचणी व रगीची लागवड करतात.

स्थलांतरित शेती

अरण्यात आदिवासी लोक राहतात ते अरण्याचा काही प्रदेश साफ करुन शेती करतात. याला स्थलांतरित शेती म्हणतात. महाराष्ट्र्रात ठाणे, नाशिक, धुळे-नंदुरबार, जळगाव, अमरावती, पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत प्रामुख्याने आदिवासी राहतात. ते डोंगराचा एखादा भाग निवडतात. तो जाळला जातो. यामध्ये वनस्पतींची सेंदि्रय द्रव्ये मिसळतात. साध्या पध्दतीने शेतीची मशागत करतात. त्यांच्याकडे अवजारेही असत नाहीत. पिकांची पेरणी ‘बी’ फोकून करतात. पावसावर पीक येते. याची फारशी देखभाल केली जात नाही. यामुळे सुरुवातीला एकदा एक दोन वर्षे पीक चांगले येते. नंतर ते एकदम कमी होते. मग जंगलाचा दुसरा भाग आदिवासी निवडतात. अशा शेतीमध्ये प्रामुख्याने तांदळाची लागवड करतात.

महाराष्ट्र्रात वेगवेगळया भागांत निरनिराळी पिके घेतात. कोकणात पाऊस जास्त पडतो त्यामुळे तेथे तांदळाचे पीक जास्त होते. याउलट पठारावर पाऊस कमी पडतो आणि माती काळी, कसदार त्यामुळे तेथे ऊस, ज्वारी, कापूस इत्यादी पीके होतात.

महाराष्ट्र्रात ज्वारी, बाजरी, गहू व तांदूळ ही महत्वाची धान्य पिके आहेत.

धान्य पिके:

तांदूळ (भात, धान) :

तांदळाच्या पिकाला भरपूर पाऊस, उष्ण, दमट हवामान आणि गाळाची जमीन लागते. तांदळाचे बी प्रथम लहान वाफ्यात पेरतात. त्याची रोपे तयार होतात. नंतर चिखलणी केलेल्या शेतात ही रोपे ओळीने पुन्हा लावतात. याला लावणी म्हणतात. काही ठिकाणी मात्र लावणी न करता बी पेरतात.

मुख्यत: कोकण व वैनगंगेचे खोरे या भागात तांदळाचे पीक जास्त होते. भंडारा, गोंदिया, ठाणे, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, संधिुदुर्ग व रत्नागिरी हे तांदळाचे जास्त पीक घेणारे जिल्हे आहेत.

महाराष्ट्र्रात ज्या भागात वर्षाला १०० सेंमी पेक्षा अधिक पाऊस पडतो त्या प्रदेशात मुख्यत: तांदूळ पिकविला जातो. भातासाठी जांभा खडकापासून तयार झालेली मध्यम, काळया, खारवट अल्कलीयुक्त व पाणथळ जमिनीचा वापर केला जातो.

गहू:

गहू रब्बी हंगामात घेतला जातो. मध्यम पावसाच्या व ओलावा टिकवून धरणार्‍या सुपीक जमिनीत गव्हाचे पीक घेतले जाते. हिवाळयात थंड हवामान गव्हाला अनुकूल असते. नागपूर, नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव, परभणी, हिंगोली या जिल्हयांत गव्हाचे पीक जास्त प्रमाणात घेतात. याशिवाय इतर काही जिल्हयांतही थोडयाफार प्रमाणात गव्हाचे पीक घेतले जाते.

थंड व कोरडी हवा, तसेच वार्षिक पर्जन्य ५० ते ७५ सेंमी असणार्‍या प्रदेशात गव्हाची पीक घेतले जाते. गव्हाच्या पिकासाठी गाळ चिकणमातीयुक्त लोम प्रकारची वाळूमिश्र्रित जमीन योग्य असते. नाशिक, अहमदनगर, पुणे, नागपुर, परभणी, अकोला, अमरावती. बुलढाणा, यवतमाळ व वर्धा जिल्हयात गव्हाचे पीक घेतले जाते.

ज्वारी :

महाराष्ट्र्रात इतर पिकांपेक्षा ज्वारीचे पीक जास्त काढले जाते. या पिकाला उबदार हवामान, काळी, कसदार जमीन आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस यांची आवश्यकता असते. तापी, पूर्णा, गोदावरी, भीमा व कृष्णा या नदयांच्या खोर्‍यांमध्ये ज्वारीची शेते दूरवर पसरलेली आढळतात. अकोला, यवतमाळ, सोलापूर, अहमदनगर, वाशिम, सातारा, पुणे, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद व औरंगाबाद या जिल्हयांत ज्वारीचे पीक मोठया प्रमाणात काढले जाते. ज्वारीचे पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामांत घेतात.

या पिकांना सर्वसाधारण पाऊस व तापमान आवश्यक असते. या पिकासाठी जमीण मध्यम खोलीची, काळी, मळीची असावी. ज्वारी हलक्या अगर भारी जमिनीत येऊ शकते. परंतु ज्वारीकरिता मात्र चिकणमातीची जमीन असणे आवश्यक असते. गोदावरी व भीमा नदीच्या खोर्‍यात ज्वारीचे क्षेत्र केंद्यि झाले आहे.

सोलापुरला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. तसेच अहमदनगर, पुणे, बीड व औरंगाबाद जिल्हयात ज्वारीचे पीक उबदार प्रदेशात घेतले जाते.

बाजरी :

बाजरी हे खरीप हंगामातील पीक असून बाजरीचे पीक उबदार हवामानात, कमी पावसात व कमी कसदार जमिनीच्या प्रदेशात घेतले जाते.

क्षेत्राच्या व उत्पादनाच्या बाबतीत नाशिक जिल्हयात प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर अहमदनगर, पुणे, औरंगाबाद व धुळे हे जिल्हे आहेत. कोकणच्या पूर्व भागातील डोंगराळ प्रदेशात हलक्या प्रकारच्या जमिनीत नाचणी, वरी, रगी व कुटकी ही कोरडवाहू पिके काढली जातात.

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s